स्मार्ट apps
भन्नाट Android Apps
आज जवळ जवळ सर्वच लोक स्मार्टफोन वापरताना दिसतात, खासकरुन Android स्मार्टफोन हे खूपच लोकप्रिय आहेत. तसेच ते माफक दरातही बाजारात उपलब्ध आहेत. आपण बहुतेक करुन या फोन्सचा वापर Internet, E-mail, तसेच Facebook, Whatsapp यासारख्या सोशल माध्यमासााठी करतो . पण याशिवायही याचा वापर आपण अनेकविध कामांसाठी करु शकतो, यासाठी लाखो apps आज play store वर उपलब्ध आहेत,
याजीलच काही स्मार्ट ॲप्स ची ओळख या ब्लॉगवर देत आहोत.
१) Airdroid :- मोबाईल ते मोबाईल Wi-fi द़़्वारे फाईल पाठवण्यासाठी आपण zappya, Flash Transfer यासारखे अनेक ॲप्स वापरतो. त्याचप्रकारे airdroid हे ॲप काम करते, पण हे ॲप मुख्यत: मोबाईल ते लॅपटॉप फाईल देवाणघेवाणीसाठी वापरतात. यासाठी हे ॲप एक wifi hotspot बनवते. व मोबाईलच्या File Manager व महत्वाच्या फिचर्स जसे calling, Messeging, Gallary, Camera यांचे रुपांतर एका Website मध्ये करते. लॅपटाप वरून कोणत्याही Browser मधून सदरच्या वेबसाईटचा पत्ता टाकूण आपण आपला फोन नियंत्रित करू शकतो, तसेच फाईल अदलाबदल करू शकतो. या वेबसाईट चा पत्ता लॅपटॉपवरून hotspot ला कनेक्ट केल्यानंतर ॲप मध्ये दिसतो, तो IP Address सारखा(192.168.43.1:8888) दिसतो. हे ॲप वापरण्यासाठी Internet चालु असणे गरजेचे नाही. तसेच मोबाईल Browser मधूनही तुम्ही हे ॲप असलेल्या मोबाईलशी connect होउन तुम्ही फाइल एक्सचेंज करू शकता व दुसऱ्याचा फोनही नियंत्रित करू शकता...
* हे ॲप कसे वापरावे ?
ॲप सुरु केल्यानंतर Hotspot वर click करा.
यानंतर Start Hotspot वर click करा.
ॲपने तयार केलेला Network SSID व password लक्षात ठेवा.
तयार झालेल्या वेबसाइटचा पत्ता असा दिसेल..
यानंतर SSID व password वापरून वायफाय हॉटस्पॉटशी आपला लॅपटॉप अथवा मोबाइल कनेक्ट करा व ब्राउजर उघडून वरील पत्ता टाका, मोबाइलवर खालीलप्रमाणे request दिसेल, ती accept करा.
लॅपटॉपवर खालीलप्रमाणे वेबसाइट दिसेल.
आता यावरून तुम्ही तुमचा ॲन्ड्रॉइड कंट्रोल करू शकता...
हे ॲप Play store वर उपलब्ध आहे.
२) Photomath :- हे ॲप २०१४ मधील टॉप १० पैकी एक आहे. साधारणत: ५ एम. बी. चे हे ॲप आपल्या फोन कॅमेराचे रूपांतर गणित स्कॅनर मध्ये करते. ॲप चालु केल्यानंतर फोनचा कॅमेरा स्क्रीन चालु होते,
या स्क्रीनवर एक आयताकृती पॉइंटर दिसेल. हा पॉइंटर कागदावरील गणितावर धरल्यास गणित आपोआप स्कॅन होते. व लगेच त्याचे उत्तरही सोडवते.
सदरील गणितावर क्लिक केल्यावर गणित सोडवलेल्या सर्व पायऱ्या दिसतात. ॲपचा पॉइंटर गणिताच्या आकारानुरार आपण बोटांनी लहान मोठा करू शकतो.
हे ॲप Offline काम करते.
No comments:
Post a Comment